• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

सर्व शासकीय कार्यालया जवळील चौकात दिशादर्शक नाम फलक लावावे

ByMirror

Dec 26, 2022

शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाची मागणी

दिशादर्शक फलक नसल्याने ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांची परवड होत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्व शासकीय कार्यालया जवळील चौकात दिशादर्शक नाम फलक लावण्याची मागणी शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


ग्रामीण भागातून शहरात विविध शासकीय कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची शासकीय कार्यालयाकडे जाण्यासाठी दिशादर्शक नाम फलक नसल्याने मोठी अडचण होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली असून, निवेदनावर राज्य प्रदेश अध्यक्ष गणेश ढोबळे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनिल सकट, शहराध्यक्ष युनूस पठाण यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण तथा सामाजीक न्याय विभाग नवीन प्रशस्त इमारतीमध्ये स्थलांतरित झाले आहेत. तसेच इतर शासकीय कार्यालयात देखील ग्रामीण भागातीक नागरिक आपली कामे घेऊन येत असतात. त्यांना ही कार्यालये सहजा सहजी सापडत नाहीत. अनेकवेळा कार्यालया जवळ येऊन शोधाशोध करावी लागते. नाहक भटकंती होऊन त्यांची फसगत होते. यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


शासकीय कार्यालया जवळील चौकात दिशादर्शक नाम फलक लावल्यास नागरिकांना कार्यालयात जाण्याचे सुलभ होणार आहे. यासाठी शहरातील सर्व शासकीय कार्यालया जवळील चौकात दिशादर्शक नाम फलक लावण्याची मागणी शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *