• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

ByMirror

Oct 7, 2022

11 ऑक्टोबरला युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातंर्गत संचलित नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात 11 ऑक्टोबर रोजी युवा संवाद व पारंपारिक समूह नृत्य स्पर्धा रंगणार असल्याची माहिती नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात यांनी दिली.


सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे युवक-युवतींचा हा सोहळा पार पडणार असून, 15 ते 29 वयोगटातील तरुण या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहेत. जिल्हास्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5 हजार, द्वितीय अडीच हजार, तृतीय एक हजार दोनशे पन्नास रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रथम विजेत्या संघास राज्यस्तरावर युवा महोत्सवात संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


युवा संवाद मध्ये इंडिया 2047 या विषयावर युवक-युवतीनी संवाद साधायचा आहे. तसेच यावेळी चित्रकला, वक्तृत्व, कविता लेखन, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर विविध कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी रहिवासी पुरावा, वयाचा दाखला नाव नोंदणीसाठी नेहरू युवा केंद्र, पटेलवाडी मंगल कार्यालय समोर, टिळक रोड येथे भेट द्यावी किंवा रमेश गाडगे 9850711389 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. विविध सर्व स्पर्धेमध्ये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *