• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात पुर्णाहूती यज्ञ

ByMirror

Oct 5, 2022

नवरात्रोत्सवाच्या विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जगदंबा मातेच्या मंदिरात पुर्णाहूती यज्ञाने नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, पीएसआय छगन कापसे, संजय जाधव, शिवाजी जाधव, पुरोहित गंधे, मारुती काळे, संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.


भाविकांच्या उपस्थितीमध्ये होम-हवन संपन्न झाला. पुर्णाहूतीनंतर देवीची आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांनी देवी मातेचा जयघोष केला. नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, मतदार जागृती, स्त्री जन्माचे स्वागत व महिला सक्षमीकरणावर उपक्रम राबविण्यात आले. नवरात्रीनिमित्त डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *