• Fri. Mar 21st, 2025

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी 75 वनौषधी झाडांची लागवड

ByMirror

Aug 16, 2022

स्वच्छता अभियान राबवून मतदार जागृती

देशभक्तांच्या बलिदानाची जाणीव ठेऊन युवकांनी देशाच्या विकास व सामाजिक कार्यात योगदान द्यावे -अ‍ॅड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकच सामाजिक क्रांती घडवू शकतात. आजची युवाशक्ती हीच आपल्या देशाची सर्वात मोठी राष्ट्रशक्ती आहे. देशाला स्वातंत्र्य अनेकांच्या त्याग, संघर्ष व बलिदानातून मिळाले असून, देशभक्तांच्या बलिदानाची जाणीव ठेऊन युवकांनी देशाच्या विकास व सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन जय असोसिएशन ऑफ एनजीओचे राज्य अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले.


नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमीच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त चांदबिबी महाल परिसरात 75 वनौषधींचे झाडे लावून, स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर मतदार जागृती अभियानातून लोकशाही बळकट करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात अ‍ॅड. शिंदे बोलत होते. यावेळी संत अण्णा चर्चेचे धर्मगुरू फादर अजय डीमोन्टी, उत्कर्षाच्या अध्यक्षा नयना बनकर, डॉ. संतोष गिर्‍हे, पोपट बनकर, सिमोन बनकर, रावसाहेब मगर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, प्रीती औटी, बाळासाहेब काकडे, विनायक निवसे, रजनी ताठे, रोहन गिर्‍हे, अभिषेक ढवळे, निलेश वटनोर, मिना जाधव, विनोद जाधव, कृष्णा वटनोर, लुईस गायकवाड, अविनाश साबळे, अक्षता त्रिंबके, अंकिता झरेकर, साक्षी बनकर, उदय ढगे, वरूण भिंगारदिवे, जेरीन नेल्सन, सॅलविन नेल्सन आदी उपस्थित होते.


नयना बनकर म्हणाल्या की, रक्तरंजीत क्रांतीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशभक्तांच्या लढ्यातून स्वातंत्र्याचे फळ सर्वसामान्य नागरिकांना मिळाले आहे. देशाचा अभिमान बाळगून प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यावा. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन केले. तर उपस्थितांना मतदार जागृतीची त्यांनी शपथ दिली. डॉ. संतोष गिर्‍हे यांनी 80 टक्के आजारांचे मूळ कारण अस्वच्छता आहे. वैयक्तिक स्वच्छतेसह परिसर स्वच्छ ठेवल्यास निरोगी आयुष्य जगता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवून या ठिकाणी जमलेला पाणी बॉटल, प्लास्टिक व खाद्य पदार्थाचे रॅपरचा कचरा बाजूला केला.


फादर अजय डीमोन्टी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान ही समाजाची गरज बनली आहे. या चळवळीत युवकांनी देश सेवेच्या भावनेने योगदान देण्याची गरज आहे. सर्वांना ऑक्सिजनरुपाने जीवन देणार्‍या झाडांना जगविण्याची गरज असल्याचे स्पष्ट करुन या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमास नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्‍वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी दिनेश शिंदे, जयश्री शिंदे, रावसाहेब काळे, शाहीर कान्हू सुंबे, दर्शन बनकर, मीना म्हसे, वैशाली कुलकर्णी, डॉ. धीरज ससाणे, सलीम सय्यद, अशोक कासार, मेजर भिमराव उल्हारे, रोहीदास गाढवे, शिवाजी नवले, पाचार्य सिताराम जाधव, डॉ. भगवान चौरे, सचिन गुलदगड, जयश्री कुलथे, उषा कपिले, कांचन लद्दे, अ‍ॅड. सुनील तोडकर, सुनील गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *