• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

जालिंदर बोरुडे शिर्डीत महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

ByMirror

May 25, 2026
नेत्र तपासणी शिबिर, नेत्रदान, अवयवदान जनजागृतीत योगदानाची दखल

नेत्र तपासणी शिबिर, नेत्रदान, अवयवदान जनजागृतीत योगदानाची दखल


बोरुडे यांच्या सारख्या सेवाव्रतींच्या कार्यामुळे समाजाला दिशा -कॅप्टन संजय कुमार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ म्हणून ओळख असलेले जालिंदर बोरुडे यांना शिर्डी येथे बी दी चेंज फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि नेत्रदान या चळवळीत सक्रीय योगदान देऊन समाज परिवर्तनासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा सन्मान बोरुडे यांना प्रदान करण्यात आला.


सार्इ पालखी निवारा सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात कॅप्टन संजय कुमार यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, उद्योजक संजय वाबळे, अभिनेत्री निवेदिता पगार, महसूलचे सुरेश घोडके, फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिषेक तुपे आदींसह सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॅप्टन संजय कुमार म्हणाले की, जालिंदर बोरुडे सारख्या सेवाव्रतींच्या कार्यामुळे समाजाला दिशा मिळत आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने नेत्रसेवा करत हजारो लोकांना नवजीवन दिले आहे. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य हे खऱ्या अर्थाने गरजूंना नवसंजीवनी ठरत आहे. लाखो व्यक्तींचे नेत्रदोष दूर करुन त्यांनी गरजूंना आधार दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच पोलीस निरीक्षक संदीप कोळी व नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांनी आपल्या मनोगतामध्ये फिनिक्स फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तब्बल 34 वर्षांपासून सातत्याने नेत्रसेवा कार्य सुरू ठेवले आहे. त्यांनी स्वखर्चाने विविध शिबिरे आयोजित करून हजारो गरजू आणि नेत्रदोष असलेल्या रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी दिली आहे. याशिवाय त्यांनी नागरिकांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाची जागृती करून अनेकांकडून नेत्रदान घडवून आणले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रमही सातत्याने राबविले जात आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना बी दी चेंज फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *