• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

एआयएफ अंतर्गत कृषी ड्रोनसाठी जिल्हा सहकारी बँकांमार्फत कर्जयोजना सुरु करा

ByMirror

May 25, 2026
प्रभाकरम फाउंडेशनचे कृषिमंत्र्यांना निवेदन

प्रभाकरम फाउंडेशनचे कृषिमंत्र्यांना निवेदन


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा बँकांमार्फत ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एआयएफ) अंतर्गत कृषी ड्रोनसाठी विशेष कर्जयोजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रभाकरम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन फाऊंडेशनचे अध्यक्ष विपुल तापकीर व निखिल कवडे यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले. यावेळी कृषीमंत्री भरणे यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली.


कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने फवारणी सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी ड्रोनची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः युवक आणि ग्रामीण उद्योजकांना कृषी ड्रोन व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सुलभ कर्जपुरवठा आवश्‍यक असल्याचे मत फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आले. कृषी ड्रोन क्षेत्राला चालना मिळाल्यास शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *