• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तलरेजा हाऊसच्या कर्मचार्‍यांचे धरणे

ByMirror

Jan 9, 2023

कामगार कायद्याप्रमाणे वेतन व इतर लाभ देण्याची लाल बावटा कामगार युनियनची मागणी

कामगारांचे प्रश्‍न सुटण्यासाठी आमदार लंके यांची मध्यस्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार कायद्याप्रमाणे वेतन व इतर लाभ मिळत नसल्याने लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने तलरेजा हाऊस मधील ज्योती व संगिता ट्रेडर्सच्या कामगारांनी संप पुकारुन बालिकाश्रम रोड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.


कामगारांच्या या प्रश्‍नावर आमदार निलेश लंके यांनी मध्यस्थी करुन सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्याशी चर्चा करुन कामगारांना न्याय मिळण्यासाठी चर्चा केली. यावेळी लाल बावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी तलरेजा हाऊस मधील मधील कामगारांचे विविध प्रश्‍न उपस्थित केले.


तलरेजा हाऊस मधील ज्योती व संगिता ट्रेडर्सच्या कामगारांना पगार वाढ न देता वेतन चिठ्ठी दिली जात आहे. त्यांचे कोणत्याही प्रकारचे सेवा पुस्तक नसून, कामगारांचे करार देखील केले जात नाही. याप्रश्‍नावर मागील एक वर्षापासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. तलरेजा हाऊसची तपासणी करण्याची मागणी करुन देखील, सत्य परिस्थिती दडपण्यासाठी त्याची तपासणी केली जात नाही. अनेकवेळा सदर प्रश्‍नावर पाठपुरावा करुन देखील कामगारांना दिलासा मिळालेला नसल्याने लाल बावटा जनरल कामगार युनियनने पुढाकार घेऊन सर्व कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडवून त्यांना कामगार कायद्याप्रमाणे वेतन व इतर लाभ मिळण्याची मागणी केली आहे.


आमदार लंके यांनी देखील गरीब कामगारांप्रती सहानूभुती असुन, त्यांचे प्रश्‍न न सुटल्यास स्वत: आंदोलनात उतरण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. तसेच भविष्य निर्वाह निधीचे फायदे मिळण्यासाठी सर्व कामगारांनी सावेडी येथील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालया समोर देखील निदर्शने केली.

या आंदोलनात अ‍ॅड. टोकेकर, मेहेर बाबा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, तलरेजा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नारंग, मधुकर कांडेकर, समद शेख, मनोज तलरेजा, विनोद वारे, जयवंत बोरुडे, विशाल कांबळे, कन्हैया बुंदेले, पंढरीनाथ मुदळ, सुरेश दळवी, शिवम यादव, राजेंद्र डहाळे, सचिन साखरे, सनी गायकवाड, राजू गायकवाड, अरबाज मोमीन, समीर शेख, रोहित जाधव, वृषाल गायकवाड, श्याम माखिजा, गौतम कांबळे, संजय मोढव, शेखर शिंदे, दिलीप भुजंग आदी सहभागी झाले होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *