• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

चांदबिबी महालावर होणार राम भरोसे मतं गंगोत्री आणि न्याय गंगोत्री गॅझेट प्रसिद्ध

ByMirror

Jan 9, 2023

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

सामान्य माणसाला कायद्याचा राज्याची खात्री वाटत नसल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नत चेतनेचा आणि कर्तव्याचा अभाव यामुळे देशातील सामान्य माणसाला कायद्याचा राज्याची खात्री वाटत नाही. सर्वत्र राम भरोसे त्याला बसावे लागत असल्याने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने चांदबिबी महालावर रविवारी 22 जानेवारी रोजी राम भरोसे मतं गंगोत्री आणि न्याय गंगोत्री गॅझेट प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.


देशात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही लोककल्याण तंत्राला तिलांजली देऊन स्वकल्याण तंत्राचा वापर केल्यामुळे प्रत्यक्ष शहरात, महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. देशातील न्यायालय वारी न्यायालय बनली आहेत. न्यायासाठी फक्त चकरा माराव्या लागत आहे. मतदान विक्री करून किंवा कवडी-कोंबडीच्या बदल्यात स्वतःचे बहुमोल मत वोट माफीयांना विकणार्‍या लोकांमुळेच या देशात कायद्याचे राज्य येण्याऐवजी रामभरोसे राज्य सुरू असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


राष्ट्रीय लोकनिवाडा सूर्याच्या साक्षीने एका गॅझेटद्वारे संघटनेचे कार्यकर्ते जाहीर करणार आहेत. न्यायासाठी रडत येणार्‍याला अनेक वर्ष कोर्टाच्या खेटा घालून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे निराश होऊन परत रडत जावे लागते. न्यायालयांचा वापर कोलदांडा घालण्यासाठी वापरणार्‍यांना मोठ्या प्रमाणात यश येते. ही बाब स्वातंत्र्यातील लोकशाही आणि लोकराज्याला काळीमा फासणारी आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले. परंतु भारतीयांना कायद्याचे राज्य उन्नत चेतनेच्या अभावामुळे खर्‍या अर्थाने राबविता आले नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.


झोपडपट्ट्या, बेरोजगारी, भ्रष्टाचार, मतविक्री, न्यायविक्री हे प्रश्‍न सुटण्याच्या हेतूने संघटना नागरिकांमध्ये जागरुती करण्यासाठी गॅजेट प्रसिध्द करणार असल्याचे म्हंटले आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, कॉ. महेबूब सय्यद, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ज्ञानदेव काळे आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *