• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

योगशिक्षक रामचंद्र लोखंडे यांचा ‘छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार’ने गौरव

ByMirror

May 19, 2026
योगशिक्षक रामचंद्र लोखंडे यांचा ‘छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार’ने गौरव

समाज निरोगी व तणावमुक्त करण्यासाठी उल्लेखनीय कार्याची दखल; योग, ध्यान आणि व्यसनमुक्ती अभियानाचे कौतुक


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजाला निरोगी व सकारात्मक जीवनशैलीकडे मार्गदर्शन करणारे योगशिक्षक रामचंद्र बाबूराव लोखंडे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. ग्रामीण भागात योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान यांचा प्रसार करून सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनजागृतीपर कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.


अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे आणि विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांच्या हस्ते रामचंद्र लोखंडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी साहित्यिक प्रतिभा खैरनार, युवा कीर्तनकार ह.भ.प. दिपाली गणगे-कोकाटे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत चाबुकस्वार, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, उद्योजक दिलावर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


रामचंद्र लोखंडे हे ग्रामीण भागात सातत्याने योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यानधारणा यांची शिबिरे आयोजित करून नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे प्रशिक्षक असून, ग्रामीण युवक आणि नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.


विशेषतः युवकांमध्ये वाढत चाललेले तणाव, नैराश्‍य आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी ते व्यसनमुक्ती विषयावर व्याख्याने देत जनजागृती करत आहेत. सकारात्मक विचार, आत्मविश्‍वास आणि मानसिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी योग आणि ध्यान किती महत्त्वाचे आहे, याविषयी ते सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यांच्या शिबिरांमुळे अनेक युवकांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे. समाज निरोगी, तणावमुक्त आणि सुसंस्कृत व्हावा या उद्देशाने सुरू असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांना ‘छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल रामचंद्र लोखंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *