• Mon. Oct 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘पिवळं वादळ’च्या दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

ByMirror

Oct 12, 2026
‘पिवळं वादळ’च्या दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

नवोदितांसह नामवंत लेखक-कवींना संधी; साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘पिवळं वादळ’ या मासिकाचा दिवाळी विशेषांक यंदाही आकर्षक स्वरूपात प्रकाशित करण्यात येणार आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून स्थानिक तसेच नवोदित लेखक-कवींना आपल्या साहित्यकृती सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, नामवंत लेखक-कवींचे साहित्यही या अंकात प्रकाशित होणार आहे.


या दिवाळी विशेषांकासाठी मान्यवर तसेच नवोदित लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी आपल्या कथा, कविता, ललित लेख, व्यंगचित्रे, चारोळ्या आदी साहित्यप्रकारांतील साहित्य पाठवावे, असे आवाहन मासिकाचे मुख्य कार्यकारी संपादक कांतीलाल जाडकर यांनी केले आहे. स्थानिक साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विविध साहित्यप्रकारांतील दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविणे, हा या विशेषांकामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लेखक-कवींनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले साहित्य पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


इच्छुक साहित्यिकांनी आपले साहित्य 25 ऑक्टोबरपर्यंत कांतीलाल महादेव जाडकर, रो बंगला क्रमांक 1, ओंकारनगर, पाण्याच्या टाकीजवळ, केडगाव देवी, अहिल्यानगर 414003 या पत्त्यावर पाठवावे, किंवा 8805922960 या व्हॉट्‌सॲप क्रमांकावरही साहित्य पाठविण्याचे म्हंटले आहे. साहित्य पाठविताना त्यासोबत लेखकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा, असेही मुख्य कार्यकारी संपादक कांतीलाल जाडकर यांनी कळविले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *