• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

कोठला भागातील विधवा महिलांना शिलाई मशीनची भेट

ByMirror

Sep 9, 2023

मदरसा तालीम-उल-कुरआनचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम

विधवा महिलांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद -अल्ताफ सय्यद

आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कोठला भागातील विधवा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होवून त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने मदरसा तालीम-उल-कुरआनच्या वतीने शिलाई मशीन भेट देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद, करीम हुंडेकरी, हाजी शौकत तांबोली, मौलाना अब्दुस सलाम, मुजाहिद (भा) कुरेशी, ॲड. फारूक बिलाल, निसार बागवान, नासिर शेख, हाफिज अब्दुल अहमद, हाफिज खालिद, मौलाना अब्दुल कादिर, मौलाना शफिक, मुस्तफा खान, नसीर खान आदी उपस्थित होते.


अल्ताफ सय्यद म्हणाले की, धार्मिक शिक्षण देत असताना मदरसेच्या वतीने विधवा महिलांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करुन दिल्यास त्यांच्या कुटुंबाचा विकास साधला जाणार आहे. आर्थिक सक्षम झालेल्या महिलांच्या कुटुंबाचा विकास झपाट्याने साधला जातो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वपरीने मदत राहणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


हाजी शौकत तांबोली म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी महिलांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करुन स्वत:च्या पायावर उभे रहावे. सर्वांच्या जीवनात अडचणी असून, या अडचणीवर मात करुन आपल्या जीवनातील ध्येय गाठून आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षित केल्यास समाजाचा व कुटुंबाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करिम हुंडेकरी यांनी आपली गरज ओळखून महिलांनी स्वत:चा व्यवसाय उभा करुन कुटुंबाला हातभार लावावा. स्वतःच्या कौशल्याची आवड ओळखून त्या क्षेत्राचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे. महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या उपक्रमाचे कौतुक केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *