• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

शेवगाव मध्ये रंगणार देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

ByMirror

May 13, 2025
माती पूजन संपन्न; स्पर्धेच्या तयारीला वेग

प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांची माहिती !


माती पूजन संपन्न; स्पर्धेच्या तयारीला वेग

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव मध्ये देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे यांनी शेवगाव मध्ये पत्रकार परिषदेत दिली.


तत्पूर्वी सकाळी या स्पर्धेसाठी आखाड्यातील मातीचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगदीश धूत व विश्‍व हिंदू परिषदेचे ज्ञानेश्‍वर वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नंदू मुंढे, शिवसेनेचे एकनाथ कुसळकर, डॉ. नीरज लांडे, विलास फाटके, उदय मुंढे, कमलेश गांधी, अजय भारस्कर, कडू मगर, दिगू तात्या काथवटे, अंकुश अण्णा कुसळकर. अंकुश ढाकणे, पाथर्डी तालीम संघाचे अध्यक्ष पप्पू शिरसाट, डॉ. प्रदीप उगले, सचिन शिरसाठ, नितीन फुंदे, ॲड. श्‍याम कनगरे, भूषण देशमुख, सोमनाथ शिंदे, गणेश गर्जे, सागर जाधव, कानीफ साखरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी सांगितले की, या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंजुर्के व प्रशांत (नाना) भालेराव यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जीम व कुस्ती संकुलचे देखील उद्घाटन होणार आहे.


या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध मल्लांची निमंत्रित थरारक कुस्ती राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा रुस्तुम हिंद अजय बनवाल यांच्यात दोन लाख रुपयांच्या बक्षीसावर रंगणारी कुस्ती ही प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात दीड लाख रुपयांची कुस्ती होणार असून, महिला विभागातही जबरदस्त झुंज पाहायला मिळणार आहे. नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात एक लाख रुपयांवर निमंत्रित कुस्ती होणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.


तब्बल 5 वर्षानंतर जिल्हा केसरी स्पर्धा होत असून, लहान ते मोठ्या एकूण 9 गटातील मल्लांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार असून, भरीव बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील एक नंबरच्या विजेत्या मल्लास स्व. छबू पैलवान लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *