• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

‘इकॅम’ अहिल्यानगर विभागाचे नूतन कार्यालय शुक्रवारी होणार उद्घाटन

ByMirror

Nov 26, 2025
पदाधिकारी आणि संचालक मंडळाला उपस्थित राहण्याचे आवाहन

केडगाव लिंक रोडवर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे नवीन कार्यालय सज्ज


पदाधिकारी आणि संचालक मंडळाला उपस्थित राहण्याचे आवाहन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) अहिल्यानगर विभागाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता केडगाव लिंक रोड येथे होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असून सर्व सभासद, पदाधिकारी आणि संचालक मंडळाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील भूषवणार आहेत. सोहळ्यास पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षयदादा कर्डिले, तसेच महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार याशिवाय इकॅम महाराष्ट्रचे अध्यक्ष उमेश रेखे, खजिनदार रावसाहेब रकिबे, महासचिव देवांग ठाकुर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


इकॅमचे हे आधुनिक आणि सुसज्ज नूतन कार्यालय आगामी काळात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्ससाठी समन्वय, प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि उद्योगविकासाचे महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार, सभासदांचे हित आणि उद्योगातील गुणवत्ता वृद्धी यासाठी हे कार्यालय मोलाचे पाऊल मानले जात आहे.


या कार्यक्रमासाठी इकॅम अहिल्यानगर विभागाचे अध्यक्ष अर्जुन ससे, सचिव श्रीकांत देवढे, माजी अध्यक्ष दत्ता झिंजुर्डे, उपाध्यक्ष राम गुंड, सहसचिव आदिनाथ म्हस्के, खजिनदार प्रतिक कांडेकर, बांधकाम समिती मार्गदर्शक मनोहर शहाणे, तसेच पॉवर सप्लाय कमिटीचे चेअरमन अमित गरुड, संचालक गणेश ननावरे आणि संपूर्ण संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *