राज्यस्तरावर घवघवीत यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या वतीने आयोजित पश्चिम भारत हिंदी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. एन. जे. पाअुलबुधे कॉलेज ऑफ एज्युकेशन, अहिल्यानगर येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या मनाली संजय पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर शुभांगी दत्तात्रेय जाधव हिने चतुर्थ क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यस्तरावर छाप उमटवली.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या वतीने पश्चिम भारत हिंदी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हिंदी भाषेतील अभिव्यक्ती कौशल्य, विचारांची मांडणी, भाषेवरील प्रभुत्व आणि लेखनातील सर्जनशीलता या गुणांचा कस या स्पर्धेत लागला. त्यामध्ये मनाली संजय पवार हिने आपल्या प्रभावी लेखनाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला. तर शुभांगी दत्तात्रेय जाधव हिने चौथा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयामध्ये विविध शैक्षणिक व साहित्यिक उपक्रम राबविले जातात. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले भाषा कौशल्य, विचारक्षमता आणि सर्जनशीलता सिद्ध करण्याची संधी मिळते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विनयनाथ पाअुलबुधे, संस्थेचे संचालक साई पाअुलबुधे, उपाध्यक्ष रामभाऊ बुचकूल, सहसचिव रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, तज्ज्ञ संचालक डॉ. रेखा राणी खुराणा, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा डावरे, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप कांबळे, डी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सविता सानप, डॉ. एन. जे. पाअुलबुधे कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. प्राची मचे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

