• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आंदोलनाला माध्यमिक शिक्षक संघाचा पाठिंबा

ByMirror

May 13, 2026

शैक्षणिक समस्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व माध्यमिक शिक्षक सोबत लढणार – सचिन झगडे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कनिष्ठ महाविद्यालयीन संच मान्यतेचे प्रचलित निकष बदलण्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शैक्षणिक समस्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व माध्यमिक शिक्षक सोबत शासनस्तरावर संघर्ष करणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन झगडे यांनी दिली.


संच मान्यतेचे विद्यमान निकष हे अनेक वर्षांपासून शासन निर्णयानुसार कार्यरत असून, कोणतीही व्यापक चर्चा न करता ते बदलण्याचा प्रयत्न होत असल्याने राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर व शिक्षण व्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.


महासंघाने मांडलेल्या मागण्या या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हिताच्या असून शासनाने त्या सकारात्मकपणे मान्य कराव्यात, अशी आमची मागणी आहे. शिक्षण क्षेत्रातील स्थैर्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रचलित संच मान्यता निकष कायम ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने केलेल्या न्याय्य आंदोलनास आमच्या संघटनेचा नैतिक व संघटनात्मक पाठिंबा कायम राहील.


या आंदोलनाप्रसंगी दिलेले आश्‍वासन पाळले नाही व संच मान्यतेसाठी निकषांबाबत सकारात्मक धोरण नसेल तर कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघासोबत अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सुद्धा आंदोलनात उतरेल असा इशारा अध्यक्ष सचिन झगडे यांनी दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष चांगदेव कडू, एम.एस. लगड, कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिवाजीराव ढाळे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे , शिरीष टेकाडे, अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी अमोल ठाणगे, खजिनदार अशोक सोनवणे, उपाध्यक्ष भालचंद्र देशमुख, सचिन फटांगरे, प्रसाद शिंदे, सोमनाथ सुंबे, सचिन जाधव, सहसचिव देविदास पालवे, राज जाधव, रावसाहेब शेळके, मोहन यादव, हिशोब तपासणीस संतोष आडकिते, देविदास सातपुते, यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *