• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री राधा-कृष्ण मंदिराच्या वतीने शहरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन

ByMirror

Sep 4, 2023

बुधवारी शहरातून निघणार शोभायात्रा

विविध धार्मिक कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि.6 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी दिली.


बुधवारी रात्री कृष्ण लीलेवर प्रवचन होणार आहे. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरुवारी (दि.7 सप्टेंबर) सकाळी भजन एवं कीर्तनचा कार्यक्रम रंगणार आहे. तर दुपारी 12 वाजता कार्यक्रमानंतर बालगोपालांच्या दहीहंडीचा कार्यक्रम व त्यानंतर महाआरती होणार आहे. या विविध धार्मिक कार्यक्रमात समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्टच्या सर्व विश्‍वस्तांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *