• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

प्रसाद शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षणाचा लाभ

ByMirror

May 24, 2026
शिक्षक सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची नियुक्ती

शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजनेचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी 100 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शक्षक नेते प्रसाद शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
नुकत्याच निर्गमित झालेल्या पत्रानुसार संबंधित प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला असून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षणाचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


शिक्षक नेते प्रसाद शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले व शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार संग्राम जगताप, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार किरण लहामटे, आमदार विक्रम पाचपुते तसेच आमदार काशिनाथ दाते यांची भेट घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आभा कार्ड काढणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यापुढे पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नसल्याने सर्वांनी तातडीने आभा कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


याबाबत प्रसाद शिंदे म्हणाले की, “शिक्षक आजारी असताना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. कॅशलेस आरोग्य योजनेमुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ही योजना सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.” याप्रसंगी शिंदे यांनी सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे शिक्षकांच्या वतीने आभार मानले आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *