• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना निकृष्ट जेवण

ByMirror

Oct 28, 2023

अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची जिल्हाधिकारीकडे तक्रार

अनेक कामगार या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिले जाणारे जेवण व अनेक कामगार या लाभापासून वंचित असल्याची तक्रार अन्याय निवारण निर्मुलन सेवासमितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी कामगारांना निकृष्ट जेवण देणाऱ्या व यामध्ये संगनमताने गैरव्यवहार करणाऱ्या संस्थेचा ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे.


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण (मध्यान भोजन) पुरविण्यात येते. दिले जाणारे भोजण अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित एजन्सीचे रिपोर्ट अर्थपूर्ण संबंध ठेवून तयार केले जात आहे. प्रत्यक्षात ते भोजण मुके जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही, अशा पध्दतीने त्याचा दर्जा आहे. तर ते भोजण त्या कामगारापर्यंत पोहोचत देखील नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


या प्रकरणाची विभागीय स्तरावरुन चौकशी व्हावी, कामगारांना कधीपासून ते भोजण सुरू केले व कधीपर्यंत मिळेल याची प्रत्यक्ष तपासणी व्हावी. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून निकृष्ट दर्जाचे भोजण पुरविणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा व चांगल्या ठेकेदाराला देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बांधकाम कामगारांसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *