• Thu. Jun 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

रविवारी स्नेहालयात राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Dec 7, 2024

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.8 डिसेंबर) रोजी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील स्नेहालयात होणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष विवेक संकपाळ पाटील, उपाध्यक्ष हेमलता काळाणे, व्यवस्थापन समितीचे उज्वला मुरकुटे यांनी केले आहे.


रविवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तर दुपारच्या सत्रात नगरसेविका शितल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्नेहालयाचे कार्याध्यक्ष अनिल गावडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, स्नेहालय अनिवासी प्रकल्पाचे अध्यक्ष हनिफ शेख, अनामप्रेमचे अजित माने, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता काळे, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, योगा ॲण्ड एरोबिकच्या डॉ. शिल्पा बालवे उपस्थित राहणार आहे.


ही स्पर्धा ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 5 व वैदिक मॅथ्स या गटात होणार आहे. ही स्पर्धा सकाळच्या सत्रात पार पडणार असून, सर्व गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह बक्षीस दिले जाणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी 7517017139 व 9049484484 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *