• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

लालबागे परिवाराच्या वतीने स्नेहालय व सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

ByMirror

Dec 14, 2024
लालबागे परिवाराच्या वतीने स्नेहालय व सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

तर मिष्टान्न भोजनाचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज -गणेश लालबागे

नगर (प्रतिनिधी)- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील आडत व्यापारी गणेश लालबागे यांनी सामाजिक संवेदना जागृक ठेऊन आपल्या मातोश्री स्व. शकुंतला रामदास लालबागे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एमआयडीसी येथील स्नेहालय व केडगाव मधील सावली प्रकल्पातील निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देऊन मिष्टान्न भोजनाचे वाटप केले.
लालबागे परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी गणेश लालबागे, वेदांत लालबागे, विहान लालबागे, संतोष कानडे, निकेश गाडळकर, अमोल चौधरी, भाऊ रासकर, संदीप गुजर, गौरव शिंदे, नितीन भुतारे, विलास धाडगे, संतोष मेहेर, नितीन भोंबाळ, नितीन साळवे, बबन मामा, विक्रांत कानडे, पूजा चौधरी, वैशाली धाडगे, मोनिका लालबागे आदी उपस्थित होते.


गणेश लालबागे म्हणाले की, शिक्षणाने जीवन प्रकाशमान होऊन परिस्थिती बदलणार आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आई-वडिल नसलेले, एकल पालक व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा सांभाळ करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेले स्नेहालय व सावली प्रकल्प मानवसेवेचे मंदिर आहे. या मंदिरात सेवा करण्याची संधी लालबागे परिवाराला मिळाली. स्व. शकुंतला लालबागे यांनी देखील आपल्या जीवनात गरजूंना नेहमीच मदत केली. त्यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *