• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

ओम नमो फाउंडेशनने केले थंडीनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

ByMirror

Dec 14, 2024
दिव्यांगांना समाजात उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज -नरेंद्र दिवटे

उघड्यावर जीवन जगणाऱ्या नागरिकांना ब्लँकेटची मदत

दिव्यांगांना समाजात उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज -नरेंद्र दिवटे

नगर (प्रतिनिधी)- शहरातील ओम नमो फाउंडेशनच्या वतीने टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना थंडीनिमित्त स्वेटरचे वाटप करण्यात आले. तसेच उघड्यावर जीवन जगणाऱ्या रस्त्यावरील बेघर नागरिकांना ब्लँकेटची मदत देण्यात आली.
याप्रसंगी इंडियन ओव्हरसीज बँकचे उपव्यवस्थापक विलास पांचाळ, प्रहार संघटनेचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, ओम नमोचे संस्थापक नरेंद्र दिवटे, प्रहार संघटनेचे सचिव हमीद शेख, अक्षय तावरे, सामाजिक कार्यकर्ते करण शेवाळे आदी उपस्थित होते.


नरेंद्र दिवटे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी समाजातील एक घटक असून, त्यांना समाजात उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. थंडीमुळे तापमान गारठत असताना सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना व उघड्यावर जीवन जगणाऱ्यांना थंडीत ऊबदार कड्यांमुळे संरक्षण होण्यासाठी स्वेटर आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. ओम नमो फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित घटकातील गरजूंना मदत पोहचवण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, गरजूंना त्यांची गरज ओळखून माणुसकीच्या भावनेने त्यांना दिलेली मदत कौतुकास्पद आहे. दिव्यांग सप्ताहाचा हा आदर्शवत उपक्रम असून, दिव्यांगांकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलून आपल्या समाजातील घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *