• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

ByMirror

Nov 28, 2024
निवडून आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा फुले पगडी घालून सन्मान

निवडून आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा फुले पगडी घालून सन्मान

नगर (प्रतिनिधी)- फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 134 व्या स्मृतीदिनानिमित्त माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा प्रश्‍न मार्गी लावणारे आमदार संग्राम जगताप पुन्हा नगर शहर मतदार संघातून मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा फुले पगडी घालून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दिपक खेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतीबा फुले स्मारक कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, बाळासाहेब भुजबळ, किरण जावळे, आकाश डागवाले, संकेत ताठे, अशीश भगत, किरण मेहेत्रे, गणेश शेलार, महेश सुडके, महेश गाडे, संतोष हजारे, स्वप्निल पडोळे, हर्षल खेडकर, अनूरा पडोळे, किरण पंधाडे, मळू गाडळकर, अमित खामकर, गणेश जाधव, डॉ. रणजीत सत्रे, विश्‍वास शिंदे, भावेश माळी, विक्रम बोरुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दिपक खेडकर म्हणाले की, शहरात उभे राहत असलेला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा सर्व समाजासाठी त्यांच्या विचारांची स्फुर्ती देणारा ठरणार आहे. या पुतळ्यांसाठी आ. जगताप यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांना मिळालेली संधी शहरातील विकास कामांना गती देणारे ठरणार आहे. त्यांच्या विजयाचा सर्व समाजाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *