• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

ओ.सी.पी.एम. स्कूल, वडाळा मिशनचे मुख्याध्यापक नामदेव पतंगे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

ByMirror

Apr 27, 2026
40 वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान

40 वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वडाळा मिशन येथील ओ.सी.पी.एम. स्कूलचे मुख्याध्यापक नामदेव राजाराम पतंगे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात तब्बल 40 वर्षे दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी मिशनचे सचिव डी. जी. भांबळ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व मराठी मिशनच्या अध्यक्षा विजयाताई जाधव उपस्थित होते.
यावेळी ललित दादा मोटे पाटील (सरपंच, वडाळा बहिरोबा), दिलीपराव मोटे पाटील (चेअरमन, जाणता राजा पतसंस्था ), भाऊसाहेब मोटे (संचालक मुळा स सा कारखाना), गुलाब सय्यद (माजी शिक्षणाधिकारी), अभयकुमार वाव्हळ (गटशिक्षणाधिकारी), सुरेश ढवळे (विस्तार अधिकारी माध्यमिक जि.प.), प्रसाद शिंदे (स्वाभिमानी शिक्षक संघटना), विठ्ठल उरमुडे (अध्यक्ष, खाजगी प्राथमिक शाळा संघटना), भास्कर नरसाळे, सुनिल नरसाळे (केंद्रप्रमुख), ज्ञानेश चव्हाण (सचिव रे.शि.प्र. मंडळ), नितीन घाडगे (सहसचिव रे.शि.प्र. मंडळ), रंगनाथ बोबडे (मुख्या ध्यापक रे.शि. प्र.मं. प्राथ विद्यालय) आदी मान्यवर उपस्थित होते.


वाद्यांच्या गजरात व पुष्पवर्षावात पतंगे यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाला रंगत आनली. मानपत्राचे वाचन करण्यात आले व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून पतंगे सर यांच्या सेवाभावी वृत्ती, शिस्तप्रियता व विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यांचा गौरव केला.


सत्काराला उत्तर देताना नामदेव पतंगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिस्त व संस्कारांची शिकवण देणे हेच माझे ध्येय होते. सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे माझा सेवाकाळ समाधानकारक ठरला असल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला. 40 वर्षांच्या अखंड ज्ञानसेवेचा गौरव करत उपस्थितांनी नामदेव पतंगे यांना निरामय, सुखी व समाधानकारक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय नामदेव पतंगे, विलास साळवे, तुकाराम वारकड, लाजरस गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *