• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

मनीषा गायकवाड ठाणे येथे महाराष्ट्र सेवा मुंबई राज्य पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Jul 23, 2024

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना गुरुपौर्णिमेनिमित्त ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात महाराष्ट्र सेवा मुंबई राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्र उभारणीचे काम करणाऱ्या गुरुजनांना वंदन करण्यासाठी इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट मल्टीपर्पज ह्यूमन सर्विस ऑर्गनायझेशन, समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्थेच्या (मुंबई) वतीने शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या राज्यातील शिक्षकांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार देण्यात आले.


ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या कार्यक्रमात मनीषा गायकवाड यांना चित्रपट अभिनेते जाकीर खान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. गायकवाड या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागील 28 वर्षापासून योगदान देत आहेत.

समाजातील गरजू विद्यार्थी व महिलांना ते नेहमीच आधार देण्याचा काम करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले असून, ते आज उच्च पदावर कार्यरत आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र सेवा मुंबई राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *