अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या तथा मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांना मानवता प्रतिष्ठान पुरस्कृत, ख्रिस्तवाणी शब्दगाणी समूह (पुणे) आणि दयासागर सामाजिक, आरोग्य व बहुउद्देशीय संस्था, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय मानवता सामाजिक कार्य गौरव पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे.
स्वागताध्यक्ष डॉ. संगीता साने व अ. भा. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व कार्यक्रम संयोजक पौलस वाघमारे यांनी आल्हाट यांना पुरस्काराच्या नावाची घोषणा पत्राद्वारे केली आहे. 7 व 8 नोव्हेंबर 2026 रोजी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. सरोज आल्हाट या केवळ कवयित्री व साहित्यिक म्हणूनच नव्हे तर अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी असून, सामाजिक प्रश्नांवर लेखन आणि जनजागृती व कार्य करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणूनही गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ ओळखल्या जातात. यापूर्वीही त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

