शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांचा खासदार निलेश लंके व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती कृतज्ञता सन्मानाने गौरविण्यात आले.
सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या वंदनीय गुरुजनांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मान सोहळा पार पडला. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालनालयचे संचालक दिनकर टेमकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर आदी उपस्थित होते.
माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांनी अनेक विद्यार्थी घडविले असून, ते विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात त्यांचे सातत्याने योगदान सुरु असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांतीज्योती कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व शाखांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.