• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

सर्जेपूरा येथे संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा शुभारंभ

ByMirror

Dec 17, 2023

बिर्याणीसह नॉन व्हेजचे विविध खाद्य पदार्थ खवय्यांना उपलब्ध

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षापासून शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सर्जेपूरा येथील हॉटेल संकल्पच्या माध्यमातून नव्याने सुरु करण्यात आलेल्या संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचे उद्घाटन किशोर लांडगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजू (मामा) जाधव, विलास लांडगे, जितेंद्र लांडगे, सागर लांडगे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, अमित लांडगे, हॉटेल संकल्पचे संचालक युवराज लांडगे, राजू वाघ, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, संजय सुपेकर, उज्वल राहुरकर, नगरसेवक श्‍याम नळकांडे, अनिल ढवण, सचिन शिंदे, निलेश सत्रे, सागर मुर्तुडकर, तुषार लड्डा, धीरज पोखर्णा, नामदेव लंगोटे, सुनिल भिंगारे, मोहर हिरनवाळे, पांडुरंग गोणे, संदीप भांबरकर आदी उपस्थित होते.


सागर लांडगे म्हणाले की, नव्याने सुरु करण्यात आलेल्या संकल्प बिर्याणी हाऊसच्या माध्यमातून नॉन व्हेजचे विविध पदार्थ खवय्यांना उपलब्ध होणार आहे. कबाब पासून तंदूर पर्यंत सर्व स्वादिष्ट खाद्य मिळणार असून, मटन बिर्याणी, दम बिर्याणी, तंदूर बिर्याणी आदी विविध बिर्याणीचा आस्वाद खवय्यांना घेता येणार असल्याचे त्यांनी माहिती दिली.


वैभव लांडगे म्हणाले की, हॉटेल संकल्पने स्वाद व दर्जेदार खाद्याच्या जोरावर मोठा खवय्या वर्ग जोडला गेलेला आहे. शहरातील खवय्यांच्या जीभेवर अधिराज्य गाजविताना नॉन व्हेजचे स्वादिष्ट खाद्याचा खजिना उपलब्ध होणार आहे. हॉटेल संकल्पच्या माध्यमातून स्वच्छ, स्वादिष्ट व्हेज आणि नॉनव्हेजची खाद्यसेवा पुरविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *