• Fri. Nov 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

मुलींच्या आरोग्यासाठी कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार

ByMirror

Nov 27, 2026
यशवंत विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनची भेट

यशवंत विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनची भेट


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर (फकीरवाडा) येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी स्वच्छता व किशोरवयीन आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
होगनस इंडिया प्रा. लि. यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि योग्य सवयी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन प्रदान करण्यात आली. तसेच विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले.


कार्यक्रमात डॉ. नयना जगताप यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, आरोग्यविषयक काळजी आणि योग्य सवयी याबाबत मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यांच्यात आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


या कार्यक्रमास होगनस कंपनीच्या एचआर नम्रता गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. तसेच संचालिका डॉ. प्रांजल गाडे-लामखडे, संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, संचालिका प्रियंका पाटील शेळके, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बनकर मॅडम, अमर बोबडे व श्रेयस दुसिंग उपस्थित होते.


कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन प्रदान केल्यामुळे विद्यार्थिनींना स्वच्छतेच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध होणार आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *