• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शहर व उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा

ByMirror

Aug 14, 2025
मनपा प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे -आबिद हुसेन

अन्यथा समाजवादी पार्टीचे मनपा आयुक्तांच्या दालनात बोंबाबोंब आंदोलन


मनपा प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे -आबिद हुसेन

नगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाला देण्यात आले असून, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास मनपा आयुक्तांच्या दालनात बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन यांनी दिला आहे.


मागील एक वर्षापासून शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी या प्रश्‍नावर आवाज उठवून देखील मनपा प्रशासनाला जाग आलेली नाही. मोकट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकणे व भटके कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण करण्याच्या पूर्वीय्चा कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मागील सहा महिन्यात शहरात मोठ्या प्रमाणात लहान मुले, मुली, महिला व वृद्धांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हजारो लोकांनी आतापर्यंत रेबीजची लस घेऊन आपले प्राण वाचविले. परंतु महापालिका अधिकारी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. या प्रकरणी आठ दिवसात शहर व उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आबिद हुसेन यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *