मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर (प्रतिनिधी)- नुसरा एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुकुंदनगर येथे झालेल्या इज्तेमाई खत्नाला मुस्लिम समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 167 बालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नाममात्र शुल्कात खत्ना करुन मोफत औषधे देण्यात आली. मालेगाव येथील मालेगाव येथील दो भाई खलिफा व डॉ. वसीम शेख यांनी मुलांची खत्ना केली. सकाळी 9 वाजल्यापासून शिबिराला प्रारंभ झाले होते.
यामध्ये शहरासह उपनगरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वी करण्यासाठी इलियास जहागीरदार, हाजी जमीर, जावेद खान, डॉ. जुबेर शेख, अन्सार शेख, इलियास लाला, कलीम शेख, शफीक रफिक शेख, शकील अहमद, नदीम शेख, अबुजर शेख, अतहर सय्यद, रिजवान सय्यद, पत्रकार शब्बीर सय्यद, फैयाज खान, अल्ताफ शेख, आसिफ खान, सैफुल सय्यद आदींनी परिश्रम घेतले.