• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

ByMirror

Apr 7, 2026
सामाजिक कार्याची दखल; शिक्षक सोसायटीकडून सत्कार

सामाजिक कार्याची दखल; शिक्षक सोसायटीकडून सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा सोसायटीचे सभासद पै. नाना डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. जळगाव येथे तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने ‘पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल हा उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते पै. डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.


या सत्कार सोहळ्याप्रसंगी महापौर ज्योतीताई गाडे, चेअरमन आप्पासाहेब शिंदे, व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, संचालक बाबासाहेब बोडखे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, सुरज घाटविसावे, वैशाली दारकुंडे, वर्षा खिलारी, राजेंद्र कोतकर, उमेश गुंजाळ, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे यांच्यासह चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे अनेक मान्यवर उपस्थित होते.


सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन या विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन पै. नाना डोंगरे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागात सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले आहेत. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, अनेक युवकांना प्रेरणा देणारे कार्य उभारले असल्याचे उपस्थितांनी कौतुक केले.


ॲड. धनंजय जाधव यांनी डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन, अपेक्षेविना समाजसेवेचा ध्यास घेऊन केलेले त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे असल्याचे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी गेल्या 34 वर्षापासून सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान झाला आहे. हा सन्मान आनखी चांगले कार्य करण्यासाठी ऊर्जा देणारे आहे. समाजाने दिलेल्या प्रेम आणि विश्‍वासाचे ऋण फेडण्यासाठी अखंडपणे कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *