• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला मैदानावर प्रारंभ

ByMirror

Nov 24, 2025
आठवडाभर रंगणार फुटबॉल स्पर्धेचा थरार

आठवडाभर रंगणार फुटबॉल स्पर्धेचा थरार


फुटबॉलसाठी आयुष्य समर्पित केलेल्या डिक यांच्या स्मरणार्थ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या गॉडविन कप 2025 या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला येथील मैदानावर प्रारंभ झाले आहे.


फुटबॉल मधील खेळाडूंना चालना व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांच्या वतीने, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली आणि डिक परिवाराच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.


गॉडविन डिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व आकाशात फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सचिव रोनाप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, सदस्य व्हिक्टर जोसेफ, फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या कोअर कमिटी सदस्य पल्लवी सैंदाणे, अभिषेक सोनवणे, श्रेया सागडे, राजेश अँथनी, सचिन पठारे, ज्येष्ठ खेळाडू मयूर गोरखा आदींसह खेळाडू उपस्थित होते.


या वर्षीच्या द्वितीय आवृत्तीत जिल्ह्यातील एकूण 12 संघ सहभागी होत असून एक आठवडाभर फुटबॉलचे सामने रंगणार आहे. जिल्ह्यातील अनेक उद्योन्मुख खेळाडूंना ही स्पर्धा आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


रविवारी पहिला सामना दुपारी 2:30 वाजता राठोड एफसी विरुध्द डॉन बॉस्को एफसी यांच्यात होणार आहे. दुसरा सामना पहिल्या सामन्यानंतर तत्काळ बाटा एफसी विरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स एफसी (ब) (यजमान संघ) यांच्यात होणार आहे.
गॉडविन कप ही स्पर्धा फुटबॉलचा उत्सव असून, दिवंगत गॉडविन डिक यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण आहे. त्यांनी फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी व खेळाडू घडविण्यासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून, फुटबॉलसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. ही स्पर्धा म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेली आदरांजली आहे. नगरच्या फुटबॉल क्षेत्रात गॉडविन डिक यांनी घातलेल्या मजबूत पायावर आधारित हा स्पर्धेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या स्पर्धेद्वारे केला जात असल्याची भावना उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली.


फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या उद्घाटनच्या सामन्यात एनएफसी ने युनिटी एफसीला 3-2 (टायब्रेकर) ने पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. तर दुसरा सामना बाटा एफसी विरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स एफसी (ब) यांच्यात अटातटीचा रंगला होता. शेवट पर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, टायब्रेकरने बाटा एफसी संघ विजेता ठरला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *