• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

दिंडीतील 410 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार

ByMirror

Jun 26, 2025
दिंडीतील 410 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार

जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनचा उपक्रम

दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेतून विठ्ठलाची भक्ती -रजनीताई ताठे

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व माहेर फाउंडेशनच्या वतीने युवक कल्याण योजनेअंतर्गत शहरात आलेल्या दिंडीचे स्वागत करुन 410 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्र्यंबकेश्‍वर वडांगळी (नाशिक) ते पंढरपूर पायी दिंडीचे शहरात आगमन झाले असता डीएसपी चौक येथील शासकीय बंगल्यांच्या प्रांगणात वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. तज्ञ डॉक्टरांनी वारकऱ्यांची तपासणी करुन गरजेनुसार औषधे दिली.


प्रारंभी दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीचे मुख्य प्रवर्तक नामदेव महाराज खुळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माहेर फाउंडेशनच्या अध्यक्षा रजनीताई ताठे, सचिव पूनम नगरकर, प्रियंका नगरकर, सोनाली नगरकर, जयश्री शिंदे, शकुंतला लोखंडे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. महेश शिंदे, पोपट सईद, मनीषा खुळे, मंदा खुळे, दशरथ खुळे, सुनील मवाळ, अशोक खुळे, मधू चव्हाणके, रविंद्र खुळे, गणपत खुळे, संगीता खुळे, विश्‍वास खुळे आदी उपस्थित होते.
सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्‍वत संपत्ती आहे. नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते तर बाह्य शरीरासाठी आरोग्य जपणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्यासाठी दिंडीच्या माध्यमातून प्रसन्नता लाभते. सेवा ही ईश्‍वराला देखील भावते. या उपक्रमातून सेवाभाव दिसून येतो, असे प्रतिपादन ह.भ.प. नामदेव महाराज खुळे यांनी केले.


रजनीताई ताठे म्हणाल्या की, दरवर्षी दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवून एकप्रकारे विठ्ठलाची भक्ती संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. वारकऱ्यांच्या सेवेतून मोठे समाधान मिळत असल्याचे सांगून, फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी सुरु असलेल्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली.


या शिबिरास जिल्हा रुग्णालयाचे विशेष सहकार्य लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश खेडकर, डॉ. जागृती गोयल, दिपाली पागिरे, उमंग फाऊंडेशनचे डॉ. संतोष गिऱ्हे यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. या उपक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *