• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

रामवाडी भागातील शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

ByMirror

Oct 14, 2024
युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम; मौखिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन

युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम; मौखिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन

नगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून रामवाडी भागातील शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालेले दंत रोगाच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने झोपडपट्टी भागातील मुलांची मोफत दंत तपासणी शिबिराचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत घेण्यात आलेल्या शिबिरास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करुन मौखिक आरोग्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. स्वालिहा बागवान, डॉ. वैष्णवी गोरे, डॉ. सावन पालवे व डॉ. सायली शिंदे आदी उपस्थित होत्या.
डॉ. स्वालिहा बागवान म्हणाल्या की, फास्टफुड व सतत चॉकलेट खाण्याने लहान मुलांमध्ये दातांचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. झोपडपट्टी भागात लहान वयातच विद्यार्थी गुटखा, मावा आदी पदार्थांचे सेवन करत असून, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. योग्यवेळी मार्गदर्शन व उपचार न मिळाल्यास ते दात गमवण्याची व गंभीर आजाराला सामोरे जाण्याची वेळ येते. आपल्या दातांची देखील निगा राखणे आवश्‍यक आहे. दातांची नियमित तपासणी करणे आवश्‍यक असून, ते उत्तम राहण्यासाठी काळजी घेणे हा उत्तम पर्याय असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना दातांची निगा राखण्यासाठी मार्गदर्शन केले.


वेळ अभावी व महागड्या आरोग्य सुविधांमुळे सर्वसामान्यांना वेळोवेळी दातांचे उपचार करणे शक्य होत नाही. मुलांमध्ये दातांचे विकार ही समस्या वाढत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण झाल्यास दातांची निगा योग्य प्रकारे राखून या समस्या कमी करता येणार आहे. त्या दृष्टीकोनाने हा उपक्रम शहरात सुरु असल्याची माहिती युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *