• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्त्री रोग तपासणी आणि वंध्यत्व निवारण शिबिराला महिलांचा प्रतिसाद

ByMirror

Oct 17, 2024
युवक कल्याण योजनेतंर्गत राहुरी फॅक्टरी येथील महिलांची आरोग्य तपासणी

युवक कल्याण योजनेतंर्गत राहुरी फॅक्टरी येथील महिलांची आरोग्य तपासणी

नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाउंडेशन, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान, नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राहुरी फॅक्टरी येथे युवक कल्याण योजनेतंर्गत मोफत स्त्री रोग तपासणी आणि वंधत्व निवारण शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
राहुरी फॅक्टरी येथील योग भवन येथे झालेल्या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साई मल्टीस्टेटचे संचालक शिवाजी कपाळे, उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ, ॲड. दिपक धिवर, सचिन साळवी, महिला समुपदेशक सौ. पोटे, श्रीकांत राऊत, नूरिल भोसले, इंजि. गोपाळ शिंदे, रवी साखरे, दिलीप पुजारी आदींसह महिला उपस्थित होत्या.


शिवाजी कपाळे म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांना स्त्री रोग व वंध्यत्व निवारणासाठी शहरात जावे लागते. त्यामुळे मोठा खर्च येतो. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य वर्गातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

oplus_131074


अनिल साळवे म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकांना आधार देण्यासाठी उमेद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरु आहे. गरजू घटकांना आरोग्य, शिक्षण व मुलभूत सुविधा निर्माण करुन देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कुणाल तनपुरे यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.


शिबिरात साईधाम हॉस्पिटल मधील डॉक्टर व नर्स यांनी महिलांची तपासणी केली. या शिबिरासाठी डॉ. स्वप्नील माने व स्वप्नाली माने यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत कदम यांनी केले. या शिबिरासाठी या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, सुनील धारुडकर, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *