• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

ByMirror

Sep 1, 2024
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

थोरात यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचे कौतुक

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना (ता. संगमनेर) येथे झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य संपतराव म्हस्के, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, गोरख चौरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.


महाराष्ट्रातून एकमेव थोरात यांची या कमिटीमध्ये निवड झाली आहे. 1952 मध्ये अच्युतराव पटवर्धन हे या कमिटीचे सदस्य होते. त्यानंतर थोरात यांची या कमिटीवर वर्णी लागल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. ना. थोरात यांनी पै. नाना डोंगरे यांचे क्रीडा व सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांचा देखील सत्कार केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *