• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्सने पटकाविला सरपंच चषक

ByMirror

Jul 29, 2026
फुटबॉल स्पर्धेतील सर्व पाच सामने जिंकून मिळवले विजेतेपद

फुटबॉल स्पर्धेतील सर्व पाच सामने जिंकून मिळवले विजेतेपद


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेश मित्र मंडळ, सैनिक नगर आयोजित सरपंच चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स एफसीने अंतिम सामन्यात सुमन एफसीचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. भुर्इकोट किल्ला जवळील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत शहरातील फुटबॉलच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
लीग कम नॉकआऊट पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत फिरोदिया शिवाजियन्स एफसीने साखळी फेरीतील तीन्ही सामने जिंकून आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले. उपांत्य फेरीत सॉकर क्लबचा 4-0 असा दणदणीत पराभव करत संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सुमन एफसीवर 3-0 असा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.


अंतिम सामन्यात मयूर गोरखा, दर्शन पवार आणि सूरज शर्मा यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. फिरोदिया शिवाजियन्स एफसीने स्पर्धेतील सर्व पाच सामने जिंकले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत संघाने एकही गोल न स्वीकारता विजेतेपद मिळवले.


बक्षीस वितरण सरपंच विजय खोमणे आणि फरताळे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुशील लोट, राकेश घावरी, सचिन वाल्मिकी आणि सनी वाघेला यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि मेहनतीमुळे स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली. या यशाबद्दल फिरोदिया शिवाजियन्स एफसीच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *