मित्रपरिवाराकडून सत्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती, अहिल्यानगर येथील फुलांचे व्यापारी नईम खान यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, व्यापारी बांधव यांच्यावतीने सत्कार करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
व्यापारी क्षेत्रात आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे नईम खान यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने उत्साहात साजरा केला. यावेळी वसंत मामा अगरकर, भाऊ पानमलकर, गणेश पानमलकर, दादा ठोकळ, गणेश गोधले, रोहन धाडगे, अजय तिवारी, रईस खान, जाफर खान, सुफियान खान आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी नईम खान यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि व्यवसायात भरभराट लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

