• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवसेनेच्या सामाजिक उपक्रमाद्वारे मूकबधिर विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप

ByMirror

Feb 8, 2025
अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने गरजूंना मदतीचा हात

अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने गरजूंना मदतीचा हात

मूकबधिर विद्यार्थ्यांनी रेखाटली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेखाचित्र

नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मूकबधिर विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांचे रेखाचित्र रेखाटले होते. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन त्यांना बक्षीस देण्यात आले.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, गणेश कवडे, दीपक खैरे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, संतोष ग्यानप्पा, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, सुनील लालबोंद्रे, वैद्यकीय मदत कक्षाचे रणजीत परदेशी, संपर्क प्रमुख ओमकार शिंदे, रोहित लोखंडे, प्रल्हाद जोशी, आनंदराव शेळके, रवींद्र लालबोंद्रे, नामदेव लंगोटे, विष्णू घुले, अपंग संजीवनी सोसायटीचे चेअरमन मधुकर भावले, महिला शहर प्रमुख शोभना चव्हाण, तृप्ती साळवे, सुनीता बहुले, सलोनी शिंदे, सुनील भिंगारदिवे, परेश लोखंडे, विकी लोखंडे, ओमकार फुलसौंदर, गणेश कचरे, प्रथमेश भापकर, मयूर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल शिंदे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस कोणत्याही जाहिरात किंवा फ्लेक्सचा खर्च न करता गरजूंच्या मदतीसाठी समर्पित करण्यात आला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मूकबधिर विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान दुप्पट केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. त्याच विचाराने आणि उद्देशाने हा उपक्रम मूकबधिर विद्यार्थ्यांसह साजरा करुन त्यांना अन्न-धान्याची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


बाळासाहेब बोराटे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. गणेश कवडे यांनी समाजोपयोगी उपक्रमाची गरज ओळखून शिवसेना विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना आधार देत असल्याचे स्पष्ट केले.


संभाजी कदम म्हणाले की, शिवसेना नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला जात आहे. समाजाला काय सेवा देता येईल? हे उद्देश ठेवून सर्व पदाधिकारी कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. बाबुशेठ टायरवाले यांनी स्पष्ट केले की, शिवसेना नेहमी समाजकारणावर लक्ष केंद्रित करत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांचा समाजकारणाचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *