• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

दत्तात्रय आभाळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने गौरव

ByMirror

May 28, 2026
शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल

नाशिक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते गौरव


शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील शालेय शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. नाशिक येथील वावरेनगर, कामटवाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते आभाळे यांना पुरस्कार देण्यात आला.


या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी, नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नानासाहेब साळवे, राज्य प्रवक्ते डॉ. अविनाश शिंदे, नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, सुधीर उमराळकर, संजय दोफ्लदे, रील स्टार आसावरी बर्वे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.


संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील भगवती माता विद्यालयात कार्यरत असलेले दत्तात्रय आभाळे यांनी आपल्या कार्यातून शिक्षण आणि समाजसेवेचा अनोखा संगम घडवून आणला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आज शिक्षक म्हणून कार्यरत असताना ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करून शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.


शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही आभाळे यांचा सक्रिय सहभाग देत आहे. ग्रामीण युवकांमध्ये शिक्षणाबाबत जागृती निर्माण करणे, स्वच्छता अभियान राबविणे, पर्यावरण संवर्धन उपक्रमात सहभाग घेणे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र आभाळे यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *