• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

वह्यांचे वाटप करुन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार

ByMirror

Jun 3, 2025
पै. नाना डोंगरे यांची सामाजिक बांधिलकी

पै. नाना डोंगरे यांची सामाजिक बांधिलकी

नगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक जाणीव ठेवून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप करून शैक्षणिक मदतीचा हात पुढे केला. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्याकडे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे संच सुपूर्त करण्यात आले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. आर्थिक व शारीरिक अडचणीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी संस्थेच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाल्यास ते निश्‍चितच उज्वल यश प्राप्त करू शकतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी पुढे येणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


बाबासाहेब महापुरे म्हणाले की, पै. नाना डोंगरे यांच्यासारखे संवेदनशील लोककार्यकर्ते दिव्यांगांना वेळोवेळी मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या या मदतीमुळे अनेक दिव्यांग मुलांचा शैक्षणिक प्रवास सुलभ होत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्‍वास वाढतो व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *