• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यस्तरीय माळी वधु-वर मेळाव्याचा समाजबांधवांनी लाभ घ्यावा -उपमहापौर ॲड. धनंजय जाधव

ByMirror

Mar 21, 2026
रविवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात माळी समाजबांधव एकवटणार

रविवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात माळी समाजबांधव एकवटणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय माळी वधू वर मेळाव्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा. दोन कुटुंबांना जोडण्याचा व कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी वधू वर मेळावे ही काळजी गरज आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्यक्ष संवाद भेटी कमी झाल्या असून. मेळाव्याच्या माध्यमातून विवाह संस्था टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन सातवे राज्यस्तरीय माळी वधू वर मेळाव्याचे स्वागताध्यक्ष तथा उपमहापौर धनंजय जाधव यांनी केले.


वधु-वर मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीत उपमहापौर ॲड. जाधव बोलत होते. यावेळी जनवार्ता जीवनसाथीचे ॲड. पोपट बनकर, लघुउद्योग, व्यवसाय, शेती व्यवसाय, स्वयंरोजगार करणाऱ्या विवाह इच्छुक युवकांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. वधूंची नोंदणी मोफत असल्याने मोठ्या प्रमाणात वधूंची नोंदणी झाली असल्याचे सांगितले. घटस्फोटीत, विधवा, विधूर, दिव्यांग यांची देखील नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळावा 22 मार्च रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड अहिल्यानगर येथे होणार आहे. या मेळाव्यात माजी महापौर भगवान फुलसौंदर, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेविका सुजाता पडोळे, आश्‍विनी लोंढे, पुष्पा बोरुडे, वंदना ताठे, रूपाली दातरंगे, आशाताई डागवाले, सुनिता फुलसौंदर, दत्ता गाडळकर, मंगल लोखंडे, संतोष म्हस्के, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, करण ससाणे, सुनीता खेतमाळीस, सरपंच सुनीता खेतमाळीस उद्योजक महेश झोडगे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, अनिल झोडगे, अण्णासाहेब शेलार, प्रा. माणिक विधाते, उद्योजक उद्धवराव नेवसे, मंगल भुजबळ, उद्योजक शंकरराव नेवसे, सारंग पंधाडे, विनायक नेवसे, सरपंच राम पानमळकर, साहेबराव निधाने, ॲड. रवींद्र बोरावके, उत्तम नाना पाटील, आदिनाथ हजारे, सुभाष लोंढे, निखिल शेलार, गणेश आंबेकर, गोरक्षनाथ ओहोळ, संभाजीराव कोकाटे आदी उपस्थित राहणार असल्याचे कायदेविषयक सल्लागार ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले.


मेळावा यशस्वीतेसाठी गणेश बनकर, प्रा. सिताराम जाधव, स्वाती डोमकावळे, ॲड. दिनेश शिंदे, जयश्री शिंदे, रामेश्‍वर राऊत, प्रा. संजय पडोळे, नितीन डागवाले, प्रा. सुनील शिंदे, ॲड. दिलीपराज शिंदे, शेखर होले, स्वाती बनकर, आश्‍विनी विधाते, सचिन मेहेत्रे, बाळासाहेब पुंड आदी परिश्रम घेत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *