• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात मोफत होमिओपॅथीक आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Mar 12, 2026
जीर्ण व दुर्धर आजारांवर रुग्णांची तपासणी करून औषधोपचार

यशोदा लंके फाऊंडेशन व हॉलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिकचा उपक्रम


जीर्ण व दुर्धर आजारांवर रुग्णांची तपासणी करून औषधोपचार

होमिओपॅथीच्या माध्यमातून मनुष्य निरोगी आणि संतुलित जीवन जगू शकतो -सुमन कुरेल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशोदा लंके फाऊंडेशन व हॉलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोफत होमिओपॅथीक आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक रुग्णांनी आपली तपासणी करून घेत औषधोपचाराचा लाभ घेतला.


खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन पीआरएम सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओ सुमन कुरेल यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक डॉ. प्रमोद लंके यांनी जुनाट सर्दी, दमा, संधिवात, जुनाट डोकेदुखी, मासिक पाळीचे विकार, मुतखडा, पोटाचे विकार आदी विविध जटिल व जुनाट आजारांवर रुग्णांची तपासणी केली. रुग्णांची सविस्तर माहिती घेऊन त्यांना आवश्‍यक त्या होमिओपॅथीक औषधोपचाराचे मार्गदर्शनही करण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. प्रियंका धाकतोडे, डॉ. ऋतुजा लांबे, डॉ. तेजस्विनी इंगोले, डॉ. संकेत लांडे यांनी देखील रुग्णांची तपासणी केली.


यावेळी बोलताना डॉ. प्रमोद लंके म्हणाले की, अनेक आजारांचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्याची क्षमता होमिओपॅथी शास्त्रात आहे. त्यामुळे आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी होमिओपॅथीचा प्रभावी उपयोग होत आहे. जगभरातील डॉक्टरांचे होमिओपॅथीकडे आकर्षण वाढत असून अनेक दिग्गज डॉक्टर देखील या पद्धतीने रुग्णांवर उपचार करत आहेत. दुर्धर व जुनाट आजारांवर होमिओपॅथीचा चांगला परिणाम दिसून येत असल्याने परदेशातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर या उपचारपद्धतीकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.


शिबिराचे उद्घाटक सुमन कुरेल यांनी स्वतःचा अनुभव सांगताना सांगितले की, होमिओपॅथीचे औषधोपचार घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला. उपचारापूर्वी सविस्तर समुपदेशन झाल्यामुळे मनातील नकारात्मकता कमी झाली व सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला. त्यानंतर औषधोपचारामुळे आरोग्य सुधारत गेले आणि जीवनातील नैराश्‍यही कमी झाले. पुढे सुरू असलेली ॲलोपॅथीची औषधेही बंद झाली. होमिओपॅथीच्या माध्यमातून मनुष्य निरोगी आणि संतुलित जीवन जगू शकतो, असेही त्यांनी सांगितले.


पीआरएम सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ राजेंद्र शिंदे यांनी या शिबिराला शुभेच्छा देऊन होमिओपॅथीच्या प्रचार-प्रसारासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विकास अरुण यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *