• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावचे मठाधिपती अशोक जाधव यांना विश्‍वसन्मान जीवन गौरव महासन्मान पुरस्कार जाहीर

ByMirror

Nov 6, 2024

मुरबाडच्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे मठाधिपती अशोक (दादा) जाधव यांना विश्‍वसन्मान जीवन गौरव महासन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री क्षेत्र संगमेश्‍वर, ता. मुरबाड (जि. ठाणे) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये जाधव यांना साधु, संत, महंत यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.


प.पू. अशोक दादा जाधव यांच्या धार्मिक व अध्यात्म क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल घोडबंदरचे विकास दादा पाटील व नगरचे सागर घोलप यांनी शुभेच्छा दिल्या. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *