• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

आर्मी स्कूल, श्री साई, ओएसएस, ऑक्झिलियम, कॉन्व्हेंट, आठरे पाटील स्कूल उपांत्य फेरीत दाखल

ByMirror

Nov 15, 2024
आर्मी स्कूल, श्री साई, ओएसएस, ऑक्झिलियम, कॉन्व्हेंट, आठरे पाटील स्कूल उपांत्य फेरीत दाखल

आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा

नगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत विजय संपादन करुन 17 वर्ष आतील मुलांमध्ये आर्मी पब्लिक स्कूल (एसी सेंटर), श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल, आठरे पाटील पब्लिक स्कूल ओएसएस स्कूल तर 14 वर्षा आतील मुलांमध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आठरे पाटील पब्लिक स्कूलने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना अहमदनगर ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


17 वर्षा आतील मुलांमध्ये आर्मी पब्लिक स्कूल (एसी सेंटर) विरुद्ध रेसिडेन्शियल हायस्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने तब्बल 6 गोल करुन 6-0 गोलने विजय मिळवला. आर्मी पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट खेळापुढे रेसिडेन्शियलला एकही गोल करता आला नाही. आर्मी पब्लिक स्कूलकडून आयुष याने 2 तर पार्थ मस्कर, ओम लगड, अस्मित याने प्रत्येकी 1 गोल केला.
आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध प्रियदर्शनी पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात आठरे पाटील पब्लिक स्कूलने 1-0 गोलने विजय मिळवला. डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध ओएसएस स्कूल मध्ये रंगलेल्या सामन्यात ओएसएस स्कूलचा खेळाडू वेदांत बनसोडे याने 1 गोल करुन 1-0 ने संघाला विजय मिळवून दिला.
श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंटने 3-0 गोलने विजय मिळवला. अमर शेख याने 2 तर ईशांत आहुजा याने केलेल्या 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही.


मुलींच्या 17 वर्ष आतील स्पर्धेत श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने 2-0 गोलने विजय संपादन केले. यामध्ये निकिता रामावत व हृदया तडके यांनी केलेला प्रत्येकी 1 गोल विजयासाठी महत्त्वाचा ठरला.
14 वर्षा आतील मुलांमध्येमाऊंट लिटरा स्कूल विरुद्ध कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल यांच्यात रंगलेल्या सामन्यामध्ये प्रणित तवले याने केलेल्या 1 गोलने कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल संघाला 1-0 गोलने विजय मिळवून दिला. आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध कैसर एज्युकेशन फाउंडेशन यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये 5-0 गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूल दणदणीत विजय मिळवला. यामध्ये अशोक चंद याने 2 तर शशांक गर्जे, शिव कोल्हे व धैर्य कोळपकर याने प्रत्येकी 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला गोलचे खाते देखील उघडता आले नाही.


ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंटचा खेळाडू स्वराज जाधव याने एकापाठोपाठ 2 गोल करुन आपल्या संघाला 2-0 गोलने विजय मिळवून दिला. आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने तब्बल 6 गोल करुन 6-0 गोलने एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये वीरेंद्र व सार्थक याने प्रत्येकी 2 तर आदर्श व प्रतीक यांनी प्रत्येकी 1 गोल केला. स्पर्धेचे पंच म्हणून सागर चेमटे, शशी गायकवाड, जोएल पिल्ले, ओम दंडवते, परेश म्याना, प्रणव पंडित, ऋषी कनोजिया काम पाहिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *