• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी अहिल्यानगर सब-ज्युनिअर संघ रवाना

ByMirror

Feb 11, 2026
धाराशिवविरुद्ध सलामीचा सामना

नांदेड येथे 12 ते 17 फेब्रुवारीदरम्यान रंगणार आंतर-जिल्हा फुटबॉल लढती


धाराशिवविरुद्ध सलामीचा सामना

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 (सब-ज्युनिअर बॉईज) नांदेड येथे दि. 12 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन अंतर्गत निवड झालेला अहिल्यानगर जिल्हा सब-ज्युनिअर मुलांचा संघ नांदेडकडे रवाना झाला आहे.


या संघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडक व गुणवंत खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून संघाचे नेतृत्व कर्णधार सम्राट आव्हाड करणार आहेत. संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रसाद पाटोळे तर संघ व्यवस्थापक म्हणून अभिषेक सोनावणे काम पाहत आहेत. अनुभवी मार्गदर्शन व तरुण खेळाडूंचा जोश यामुळे संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उत्कृष्ट खेळ करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंह मिन्हास, अमरजितसिंह शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंह परमार, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, तसेच सदस्य राजू पाटोळे यांनी दिल्या आहेत.
स्पर्धेतील अहिल्यानगर जिल्हा संघाचा सलामीचा सामना धाराशिव जिल्हा संघाविरुद्ध दि. 12 फेब्रुवारी रोजी होणार असून, या पहिल्याच लढतीत चुरशीचा सामना रंगणार आहे.



अहिल्यानगर जिल्हा सब-ज्युनिअर संघ
सम्राट आव्हाड (कर्णधार), शौर्य चंगेडिया, ईशान पटारे, स्वराज जाधव, प्रथम गव्हाणे, देवर्ष पत्की, हर्ष फुलसौंदर, वीरेन सोलट, रुद्र भोये, आर्यन बोर्डे, साईदीप भगत, वेदांत बांगर, अवनीश देशमुख, अलोक कनोजिया, साई खाडे, शौर्य मोरे, झायन शेख, विहान बोथरा, मोहित चौधरी, विधान देशमुख.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *