• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर सब-ज्युनिअर मुलींचा संघ जाहीर

ByMirror

Jun 21, 2026
20 ते 25 जूनदरम्यान रंगणार राज्य अजिंक्यपद स्पर्धा

पालघर येथे होणाऱ्या राज्य आंतरजिल्हा स्पर्धेत होणार सहभागी


20 ते 25 जूनदरम्यान रंगणार राज्य अजिंक्यपद स्पर्धा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशन (WIFA) आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब-ज्युनिअर मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 ची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. 20 ते 25 जून 2026 या कालावधीत पालघर येथे होत असून, या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (अहिल्यानगर) तर्फे अहिल्यानगर जिल्हा संघाची घोषणा करण्यात आली आहे.


संघात प्रांजल काकडे (कर्णधार), सिद्धी पोटे, काव्या पेटकर, रुहिका सैंदाणे, स्पृहा वैद्य, जानवी देठे, कियाना गांधी, आराध्या खंडेलवाल, जस्मित खुराना, सिद्धी कुरुंद, सायशा कर्डीले, लेहेर भंडारी, समृद्धी झिने, अवनी वाघमारे, महती बहुरुपी, आर्या शिरसाठ, रिद्धी चेमटे आणि तनुजा गुंजाळ या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रसाद पाटोळे तर संघ व्यवस्थापक अश्‍विनी पाटोळे हे जबाबदारी सांभाळणार आहेत.


अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, खालिद सय्यद, अमरजीत सिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपाल सिंग परमार, सहखजिनदार रणबीर सिंग परमार तसेच कार्यकारिणी सदस्य राजू पाटोळे यांनी देखील संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन करुन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


या राज्यस्तरीय स्पर्धेपूर्वी संघाच्या सराव शिबिरासाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल गुलमोहर फुटबॉल क्लबचे प्रमुख जोएब खान आणि प्रशिक्षक सुभाष कानोजिया यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे संघाची तयारी अधिक प्रभावीपणे पार पडल्याची भावना असोसिएशनने व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *