• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

जालिंदर बोरुडे यांना आदर्श दृष्टी मित्र पुरस्कार जाहीर

ByMirror

Dec 9, 2024

नवी दिल्ली येथे होणार सन्मान

नगर (प्रतिनिधी)- नवी दिल्ली येथील महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा आदर्श दृष्टी मित्र पुरस्कार अहिल्यानगर येथील फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी दिली.


महात्मा गांधी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येते. अहिल्यानगर येथील नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी 30 वर्षापासून फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर व नेत्र शिबिर आयोजित करून विविध स्तरातील अनेक गोरगरिबांना मोतीबिंदू, काचबिंदू व नेत्रदानच्या शस्त्रक्रिया घडवून आणले आहेत. या सेवेच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी देण्याचे कार्य निस्वार्थ भावनेतून ते करत आहे.


आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो वंचित दीन-दुबळ्या घटकातील रुग्णांना निस्वार्थ भावनेतून ही सेवा दिली जात आहे. बोरुडे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवार्थी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण 25 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव गोपाल माजगांवकर यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *