• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी मन्सूर शेख

ByMirror

Nov 18, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची तर सरचिटणीसपदी नगरचे पत्रकार मन्सूरभाई शेख यांची निवड झाली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही निवड आहे. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष शरद पाबळे यांनी मुंबईत ही घोषणा केली.


परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवडला होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या निवडीची घोषणा करण्यात आली. मन्सूरभाई शेख गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपासून ते मराठी पत्रकार परिषद, मुंबई या संघटनेशी जोडलेले आहेत. परिषदेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्षपदही भूषविले आहे. इतरही संघटनांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. एक मनमिळाऊ, मितभाषी पत्रकार आणि चांगला संघटक असलेल्या मन्सूरभाई यांचे न्यूज टुडे 24 हे सवत:चे युट्यूब चॅनल आहे. विविध दैनिकाचे प्रतिनिधीत्वही ते करतात

. याशिवाय नगरमधील विविध सामाजिक संघटनांशी ते जोडले गेलेले आहेत. पत्रकार आणि समाजातील इतर घटकांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांना पुरस्कार, वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वैदयकीय मदत देण्याची पद्धतही त्यांनी नगरमध्ये सुरू केली. दोन्ही नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *