• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

रिपाईत जमीर सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश

ByMirror

Nov 6, 2022

जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता सर्व समाजाला बरोबर घेऊन रिपाईचे कार्य -सुशांत म्हस्के

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात सामाजिक कार्यकर्ते जमीर मीर सय्यद यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी सय्यद व इतर कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, निजाम शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, सचिन शिंदे, नईम शेख, जमीर इनामदार, अजीम खान, बंटी बागवान, जावेद सय्यद, दिनेश पाडळे, सुफियांन शेख, हुसेन चौधरी, आदिल शेख, सोहेल शेख, अनिकेत भंडारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


सुशांत म्हस्के म्हणाले की, अन्यायाला वाचा फोडून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाई कार्यरत आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी आरपीआयचा संघर्ष सुरु असून, डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने सुरु आहे. जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता सर्व समाजाला बरोबर घेऊन व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर सय्यद यांच्यावर रिपाईची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

सत्काराला उत्तर देताना जमीर सय्यद यांनी सर्व कार्यकर्त्यांसह पक्ष वाढविण्यासाठी व विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *